मोठी गुड न्यूज : १५ कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, मिळाला डिस्चार्ज   

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढतोय तसाच तो कमी देखील होतोय.  राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होताना आता पाहायला मिळतंय. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यातील १२ मुंबईतील रुग्ण आहेत.

मुंबई - महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. अशात आज २६ मार्च दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे १२४ रुग्ण आढळून आल्याची आकडेवारी सरकार आणि आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे. जगभराशी तुलना केल्यास देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी खूप कमी आहे. मात्र असं असलं तरीही महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा आणखीन वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगली जातेय.  

ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढतोय तसाच तो कमी देखील होतोय.  राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होताना आता पाहायला मिळतंय. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यातील १२ मुंबईतील रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  १२४ झाली आहे. मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

लढा कोरोनाशी : पोलिस फक्त फटकेच देत नाहीत, हे पाहा खाकी वर्दीतील देवदूत... 

महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी : 

नवी मुंबईतून आज (२६ मार्च) सकाळीच एक दुःखद बातमी समोर आली बातमी आहे आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची. नवी मुंबईत कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. वाशीतील खासगी रुग्णालयालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. सदर मृत्यू 24 तारखेला झालेला होता, मात्र या महिलेचा कोरोना रिपोर्ट येणं बाकी होतं. सदर महिलेचा आज कोरोना रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये ही महिला पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालंय. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित नागरिकांचा मृत्यूचा आकडा ४ वर गेलाय. 

good news 15 corona positive become covid19 negative gets discharge  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news 15 corona positive become covid19 negative gets discharge