आनंदाची बातमी! कोरोना उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजूरी... वाचा कोणते आहे 'ते' औषध

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

आता रेमेडिसीविर, टॉसिलीझूमॅब,हायड्रोक्सिक्लोरोक्वीन सह इटॉलिझुमॅब औषध देखील कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.

मुंबई : कोरोना आजाराच्या उपचारासाठी ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया ने बायोकॉन च्या 'इटॉलिझुमॅब' औषधाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता रेमेडिसीविर, टॉसिलीझूमॅब,हायड्रोक्सिक्लोरोक्वीन सह इटॉलिझुमॅब औषध देखील कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.कोरोना रुग्णांसाठी औषधांचा झालेला तुटवडा यामुळे दूर होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.

वाचा -  राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 

डीसीजीआय ने दिलेल्या माहितीनुसार या इंजेक्शनचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. या औषधाचे कोरोना रुग्णांवर 'क्लिनिकल ट्रायल' घेण्यात आला असून त्यात हे औषध कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे समोर आले. कित्येक वर्षांपासून हे इंजेक्शन सिरॉसिस आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येत होते. 

वाचा - 'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ.

डीसीजीआयने केवळ आपत्कालीन परिस्थितीत मोनोक्लोनल एंटीबॉडी इंजेक्शन इटॉलीजुमॅब या औषधाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. याआधी कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर करून निरीक्षण करण्यात आले. या औषधामुळे रुग्णांची तब्येत सुधारत असल्याचे दिसले. त्यानंतर या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वाचा - ठाणेकरांनो जागे व्हा!, शहरातली परिस्थिती भयावह

डीसीजीआय मधील एका अधिकाऱ्याने सांगितले की एम्स सह इतर रुग्णालयांतील श्वसन रोग तज्ञ,औषध संशोधकांच्या समितीने या औषधांच्या एकूण परिणामांचा अभ्यास केला. या औषधाचे निष्कर्ष सकारात्मक आल्याने औषधाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या औषधाचा वापर करण्याआधी डॉक्टरांना या औषधाची माहिती रुग्णांना देणे बंधनकारक आहे तसेच यासाठी रुग्णांच्या परवानगीची आवश्यकता देखील असणार आहे.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! Another medicine approved for corona treatment ... Read what is 'that' drug