'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ...

एका महिन्यात बेस्च्या फेऱ्यांची संख्या बत्तीसशेपर्यंत गेली आहे. एकूण फेऱ्यांच्या ही 91 टक्के असल्याचे सांगण्यात आले. 

'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ...

मुंबई ः लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात झाल्यापासून बेस्टच्या फेऱ्यात एका महिन्यात एक हजाराने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर प्रवासीही दहा लाखांनी वाढले आहेत. त्यामुळे बेस्टचे दिवसाचे उत्पन्न नव्वद लाखांवर गेले आहे. अनलॉक करण्याची प्रक्रिया 8 जूनपासून सुरु झाली. त्यादिवशी बेस्टच्या बावीसशे फेऱ्यांचा लाभ अडीच लाख प्रवाशांनी घेतला होता. कार्यालये आणि दुकाने खुली करण्यास सुरुवात केल्यामुळे हे घडले होते. आता एका महिन्यात बेस्च्या फेऱ्यांची संख्या बत्तीसशेपर्यंत गेली आहे. एकूण फेऱ्यांच्या ही 91 टक्के असल्याचे सांगण्यात आले. 

वाचा - ठाणेकरांनो जागे व्हा!, शहरातली परिस्थिती भयावह

बेस्टचे प्रवासी प्रत्येक दिवशी वाढत आहेत. सध्या रोजच्या प्रवासांची संख्या दहा लाख आहे, या महिन्याअखेर ही प्रवासी संख्या रोजची सरासरी 15 लाख असेल असा कयास आहे. त्यामुळे रोजचे उत्पन्नही एक कोटीपेक्षा जास्त होऊ शकेल असा आधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यासाठी बेस्टचा हातभार लागत आहे. ते मुंबईसह उपनगरात एकंदर पाचशे मार्गावर फेऱ्या सुरु चालवण्याचा विचार करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत वसई विरार, कल्याण, बदलापूर, पनवेल मार्गावरील स्पेशल सेवा तसेच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेली सेवा बंद केल्यानंतरही प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.  

वाचा - 'साहब...हम फिरसे मुंबई नही आयेंगे', असं म्हणणारे श्रमिक पोटापाण्यासाठी पुन्हा मुंबईत येण्याच्या तयारीत

बेस्टने आता पास विक्रीही सुरु केली आहे. ही विक्री 29 ठिकाणी सुरु केली आहे. अर्थात सुरुवातीस ही सुविधा सध्या पासच्या नूतनीकरणासाठी आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन कालावधीतील पासची मुदत वाढवण्यासाठीच आहे. सध्या बेस्टमध्ये एकावेळी बसलेले 25 तर उभे पाच प्रवासी असतात.

-------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

Web Title: Number Rounds Base Has Gone Thirty Two Hundred Month Was 91 Cent Total Rounds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top