Corona Update: मुंबईकरांना दिलासा! मृत्युदरात सातत्याने घट

सलग दुसऱ्या दिवशी ४० पेक्षा कमी मृत्यू; दिवसभरात 1 हजार 266 नवे रुग्ण
Mumbaikars
MumbaikarsSocial-Media

मुंबई: शहरात आज 1 हजार 266 नवीन रुग्ण सापडले तर 855 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 7 लाख 02 हजार 532 इतकी झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे मुंबईतील मृत्यूदर सातत्याने कमी होताना दिसतोय. सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूसंख्या ही 40 पेक्षा कमी असून शहरात 36 रुग्ण दगावले. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.19 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ही कमी होऊन 351 दिवसांवर आला. त्यामुळे मुंबईत नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. (Good News Corona update Mumbai Observes deaths below 40 on 2nd consecutive day)

Mumbaikars
Video: "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक

आतापर्यंत 61 लाख 73 हजार 6 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 28,310 हजारांवर आला. मुंबईत 855 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6 लाख 57 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत आज दिवसभरात 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 778 वर पोहोचला. मुंबईत 41 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 179 इतकी आहे.

Mumbaikars
E-Sakal Impact: 'त्या' वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू

धारावीत 4 तर दादरमध्ये 14 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत केवळ 4 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे तेथील एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 802 वर पोहोचली आहे. दादरमध्ये 14 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9 हजार 399 झाली आहे. माहीममध्ये 12 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9 हजार 686 इतके रुग्ण झाले आहेत.

(संपादन-विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com