E-Sakal Impact: 'त्या' वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू

E-Sakal Impact: 'त्या' वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू
Summary

वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी मदत उपलब्ध करून देण्यासाठी केले प्रयत्न

विरार (मुंबई): चक्रीवादळामध्ये (Cyclone Tauktae) पश्चिम किनारपट्टीवरील अनेक घरांचे, शेतीचे, बागांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिक्षिका ज्या ठिकाणी राहतात. त्या वृद्धाश्रमाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही बातमी 'ई-सकाळ'मध्ये दिसल्यानंतर त्याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिक्षिकेची चौकशी केली. तसेच, राज ठाकरे यांनीही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संध्याकाळपासूनच आश्रमाला मदतीचा ओघ सुरु झाला. यातच वसईच्या तहसीलदार उज्वला भगत (Ujjwala Bhagat) यांनीही त्या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि तातडीने मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तसेच, आज 'युवासेने'तर्फे आश्रमाला एक महिन्याचे रेशनचे धान्य देण्यात आले. तसेच, उडालेल्या पत्र्यांच्या जागी स्लॅब (Slab) टाकून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. (Help started pouring after E-Sakal Publishes News of Uddhav and Raj Thackeray's Teacher Suman Randive)

E-Sakal Impact: 'त्या' वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू
Video: "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक

आपल्याला शिकवणारी बाई वृद्धाश्रमात असून त्या वृध्दाश्रमाचे वादळाला मोठे नुकसान झाल्याचे समजल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आश्रमात फोन करून आपल्या बाईची चौकशी करून मदतीचे आश्वासन दिले होते. आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाईची चौकशी केली यावेळी बाई आपल्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या होत्या . असे असले तरी सुमन बाईंनी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांचीही विचारपूस राज यांच्या कडे केली यावेळी राज यांनी आश्रमाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . ठाणे आणि पालडगर जिल्हा मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना यांना याबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत आश्रमाचे काम होई पर्यंत येथील वृद्धांना मनसे तर्फे दुसर्या कडे स्थलांतरित करण्यात येणार असून त्या ठिकाणी त्यांच्या जेवणा खाण्याची सोया करण्यात येणार आहे.

E-Sakal Impact: 'त्या' वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू
P305 दुर्घटना: पाच कंपन्यांना समन्स, 10 जणांचे जबाब नोंदवले

मदतीचा ओघ सुरू...

'सकाळ'मध्ये बातमी आल्यानंतर वसईच्या तहसीलदार उज्वला भगत या बुधवार दुपारपासून त्या ठिकाणी ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांनी आश्रमातील वृद्धांबरोबर संवाद साधला. तसेच शासनाच्या वतीने तातडीने काय मदत करता येईल, याचा आढावा घेतला. रात्रीत या ठिकाणी ८० सिमेंटचे पत्रे आणि विटा आल्या. गुरूवारी युवासेनेच्यावतीने एक महिन्याचे सामान आश्रमाला देण्यात आले. यात बांधकामाचे साहित्यही होते. छपराच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे, असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र राहुल कनल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

E-Sakal Impact: 'त्या' वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज? नवाब मलिक म्हणतात...
  • 'युवासेने'ने 320 गोणी सिमेंट, 20 हजार विटा,100 किलो तांदूळ, 100 किलो पीठ, 100 किलो कांदे, 100 किलो बटाटे, 100 चहा पावडर पाऊच, 100 लीटर तेल, 50 किलो साखर, 50 किलो डाळ, 50 मच्छरदाण्या, 50 बेड्स, 50 उश्या, 50 चादरी देण्यात आल्या.

  • शिवसेनेचे पंकज देशमुख आणि दिवाकर सिंग यांनी आश्रमाला भेट देऊन कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, याची माहिती घेतली. तर समाधान फाउंडेशनचे अविनाश कुसे, प्रवीण नलावडे, हनीफ पटेल यांनी वृद्धांसाठी मनोरंजनाची साधने दिली.

  • 'ई-सकाळ'च्या बातमीची दखल घेत नवी मुंबई येथील रामचंद्र दळवी आणि सीमा दळवी यांनी SR फाउंडेशनतर्फे आश्रमाला दीड लाखांचा चेक दिला.

  • जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. योगिता यांनी सर्व वृद्धांची कोरोनाचाचणी केली. तसेच, त्यांना लवकरच लसही देण्यात येणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com