

ASHA Workers Diwali Bonus
ESakal
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा घटक असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना दिले आहेत. याबाबत महापौरांनी आयुक्तांना लेखी पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.