Mumbai Local : कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर! गर्दीचा ताण कमी होणार; १५ डब्यांच्या लोकल धावणार

कसारा मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी दिवाळीत मिळणार खुशखबर! मध्य रेल्वेने या मार्गावरील १२ डब्यांच्या १८ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचे केले नियोजन.
Mumbai Local

Mumbai Local

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - कसारा मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी दिवाळीत खुशखबर मिळणार आहे. मध्य रेल्वेने या मार्गावरील १२ डब्यांच्या १८ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन केले आहे. या लोकल १५ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे नव्या फेऱ्या न वाढवताच प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. परिणामी, गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या लोकलचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com