

Senior Citizens to Benefit as 33 Local Trains Add Special Coaches and Seats
-नितीन बिनेकर
मुंबई : दररोजच्या गर्दीशी दोन हात करत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक ज्येष्ठ प्रवाशांचा विचार करून ३३ लोकल गाड्यांमध्ये स्वतंत्र आसनव्यवस्था आणि विशेष डबा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या लोकलमध्ये बदल सुरू असून, लवकरच ज्येष्ठांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.