दिलासादायक ! मुंबईतील 'जी उत्तर' विभागातील रूग्णवाढ आटोक्यात

मिलिंद तांबे
Tuesday, 15 September 2020

दादरमध्ये आज 25 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,058 इतकी झाली आहे.

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून जी उत्तर वॉर्डातील ओरॉन रुग्णाची संख्या 100 च्या वर गेलेली. हीच रुग्णसंख्या आज कमी झालेली पाहायला मिळालीये. रूग्णसंख्या आज आटोक्यात आली असून जी उत्तरम वॉर्डमध्ये आज 52 नव्या रुग्णांची भर पडली.

धारावीसह दादर, माहिममध्ये देखील कोविडबाधित रूग्णांची संख्या घटली आहे. धारावीमध्ये आज दिवसभरात 7 नवीन रूग्ण सापडले असून एकूण तिथली रूग्णसंख्या 2,945 इतकी झाली आहे. तर धारावीत 144 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

तर, दादरमध्ये आज 25 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,058 इतकी झाली आहे. या भागात 466 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आज 20 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2,782 इतकी झाली. तर इथेही 493 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्त्वाची बातमी मुंबईकरांनो सावधान, गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये आढळेल कोरोना रुग्ण

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर (G North) विभागात आज 52 नवीन रुग्णांची भर पडली असून आता रूग्णांचा एकूण आकडा 8,785 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 526 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,530, दादरमध्ये 2,490 तर माहीममध्ये 2,192 असे एकूण 7,212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,103 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

( संकलन - सुमित बागुल )

good news for g north ward of mumbai covid count is in control after three days rise in count


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news for g north ward of mumbai covid count is in control after three days rise in count