मुंबईकरांनो सावधान, गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये आढळले कोरोना रुग्ण

समीर सुर्वे
Tuesday, 15 September 2020

मुंबईत गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : मुंबईत गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या तीन दिवसात 11 हजार 483 हायरिस्क व्यक्तींची रवानगी कोविड केंद्रांमध्ये करण्यात आली आहे.

अनलॉक आणि गणेशोत्सवानंतर मुंबईत पुन्हा कोविड रुग्ण वाढू लागले आहेत. यात प्रामुख्याने इमारतीत रुग्ण वाढू लागले आहेत. 5 सप्टेंबर रोजी  7 हजार 99 इमारतींमध्ये रुग्ण आढळले होते. या इमारतीमध्ये 7 लाख 90 हजार नागरीक राहत होते. तर 13  सप्टेेंबरपर्यंत 8 हजार 637 इमारतींमध्ये रुग्ण आढळले आहेत. या इमारतींमध्ये 9 लाख 40 हजार नागरीक राहत आहेत. गेल्या आठ दिवसात सिल इमारतींची संख्या 1 हजार 538 ने वाढली आहे.

मोठी बातमी : मंत्री उदय सामंत यांना आला धमकीचा फोन

मुंबईत कोविडचा संसर्ग वाढू लागल्याने पालिकेने संपर्क शोध मोहिम अधिक तिव्र केली आहे. कोविड बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 66 हजार 550 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.त्यातील 11 हजार 483 जणांना कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पालिकेने 24 प्रभागांमध्ये आरोग्य सेविका आणि स्थानिक स्वयंसेवक इमारती, चाळी, झोपडपट्टीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. एखाद्या भागात यापूर्वी सर्वेक्षण झाले असले तरी पुन्हा संबंधित भागात जाऊन केले जात आहे. एकही घर या सर्वेक्षणातून सुटू नये याची काळजी घेतली जाते आहे असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मोठी बातमी : छम छम बारबाला झाल्यात बिझनेस वूमन, 'अशी' शक्कल लढवून भरतायत पोटाची खळगी

तर बिल्डिंगच सिल होणार 

सध्या इमारतींमध्ये रुग्ण आढळल्यावर तो मजला किंवा विंग सिल केली जाते.मात्र,इमारतींमध्ये रुग्ण वाढू लागल्यावर आता पालिका संपुर्ण इमारतच सिल करत आहे.ज्या इमारतींमध्ये 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळतील ती संपुर्ण इमारत सिल करण्यााााचे आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

beware mumbaikar in past eight days new covid patients found from more than one thousand buildings


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beware mumbaikar in past eight days new covid patients found from more than one thousand buildings