तळीरामांसाठी गुड न्यूज, आता घरबसल्या मागवा आपली आवडती दारु

तळीरामांसाठी गुड न्यूज, आता घरबसल्या मागवा आपली आवडती दारु

मुंबई -  लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे सरकारनं लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दारुची दुकानं उघडण्यात आली. दरम्यान सोमवारी दारुची दुकानं उघडल्यानंतर सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुंबईत पालिकेनं पुन्हा दारुची दुकानावर निर्बंध आणले. परंतु, सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता महसूल वाढवण्यासाठी दारुची दुकानं सुरु ठेवणं गरजेचं आहे. तसंच राज्याचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी दारुची दुकानं सुरु करण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्य मंत्रिमंडळाच्या घेण्यात आली. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी ही भूमिका मांडली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्य नियोजन करुन दारुची दुकानं मुंबईसह राज्यभर सुरु करण्याबाबत या बैठकीत एकमत झालं. तसंच यावर पर्याय म्हणून ऑनलाइन पद्धतीनं दारु विक्री करण्यासही अनुमती देण्यात येणारेय. पण यावेळी इतर राज्यांनी कशा पद्धतीनं गोष्टी हाताळल्या आहेत, त्याची माहिती घेतली जाईल. 

सुत्रांनी सांगितलं की, दारुच्या दुकानांबाहेर होणारी गर्दी कमी करण्यासाठी काही काळासाठी बिअर शॉपीमध्ये दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी असंही या बैठकीत ठरलं. सध्या राज्यातील बिअर शॉपीचा आकडा 4947 आहे. तर विदेशी मद्य विक्रीची 1685 दुकानं आहेत. 

बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेऊनही काही जिल्ह्यांमध्ये ती सुरू करण्यात आली नसल्या बद्दलचा विषय उपस्थित केला. दारूची दुकाने एरवीही सुरुच असतात. लॉकडाऊनच्या काळात ज्या ठिकाणी ही दुकाने सुरू झाली. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तरी योग्य नियोजन केले असते तर गोंधळ टाळता आला असता, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले. 

योग्य नियोजन करून तसंच उत्पादन शुल्क विभागानं काढलेल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करून ही दुकाने कंटेनमेंट झोन वगळता लवकरात लवकर सुरू करावीत, असं मतंही बैठकीत व्यक्त करण्यात आलं. त्यानुसार येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट निर्देश जारी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत दारुची दुकानं बंद 

सोमवारी दारुची दुकानं उघडताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. मुंबई शहर हे रेड झोनमध्ये असतानाही दारुसाठी तळीरामांनी तुडूंब गर्दी केली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबईत दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला. 

पालिका आयुक्तांचा दणका

मुंबईत दारूच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहून पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा कठोर निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने सोडून मुंबईत इतर कोणतेही दुकान उघडण्यास मनाई असेल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

पालिकेनं पत्रात नमूद केलं आहे की, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करताच नागरिकांनी रत्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. अशात सोशल डिस्टंसिंग देखील पाळलं जात नसल्यामुळे मुंबईत आधीसारखेच लॉकडाऊन पाळले जाईल.

good news for liquor lover now home now you can order your favorite liquor online 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com