esakal | म्हाडा विजेत्यांसाठी खुशखबर, घराचा ताबा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा विजेत्यांसाठी खुशखबर, घराचा ताबा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

क्वारंटाइन सेंटरसाठी घेतलेली घरे म्हाडाच्या ताब्यात, ताबा देण्याचे काम सुरु

म्हाडा विजेत्यांसाठी खुशखबर, घराचा ताबा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई, ता. 28 : कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने म्हाडा सोडतीमधील घरे ताब्यात घेतली होती. ही घरे पुन्हा महापालिकेने म्हाडाच्या ताब्यात दिली आहेत. या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया म्हाडाने सुरु केली असून विजेत्यांना आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करता येणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने विशेष अधिकार वापरून म्हाडाने सोडतीमध्ये काढलेली घरे ताब्यात घेतली. यामुळे विजेत्या अर्जदारांना घराचा ताबा देण्यात अडचण येत होती. अनेक विजेत्यांनी घराची पूर्ण रक्कम म्हाडाकडे जमा केली आहे. याचे गृहकर्जाचे हप्तेही विजेते भरत आहेत.

महत्त्वाची बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्यात, म्हणालात 'मास्क न घालणारे किलर' 

असे असताना विजेत्यांना घराचा ताबा मिळत नसल्याने विजेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर महापालिकेने क्वारंटाइन सेंटरसाठी घेतलेली घरे पुन्हा म्हाडाकडे सोपविली आहेत. त्यानुसार चेंबूर येथील सेल कॉलनीतील 200 हून अधिक घरे, महावीर नगर येथील 170 घरे आणि कांदिवली चारकोप सेक्टर 8 मधील 150 घरे महापालिकेने म्हाडाच्या ताब्यात पुन्हा दिली आहेत.

चारकोप येथील एक विंग अद्याप महापालिकेने म्हाडाच्या ताब्यात दिलेली नाही. मात्र विजेत्यांनी घराचा ताबा देण्याची मागणी लावून धरल्याने घरांचा ताबा देण्याबाबत मुख्य अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे मुंबई मंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच चारकोप येथील घरांचा ताबा विजेत्यांना देण्यात येणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

good news for mhada flat owners possession crisis amid corona sorted

loading image
go to top