मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्यात, म्हणालात 'मास्क न घालणारे किलर' 

समीर सुर्वे
Monday, 28 September 2020

दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ्यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात.

मुंबई, ता. 28 : दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ्यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात. हे मास्क न वापरणारे किलक आहेत. अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला. मुंबई महापालिकेने गेल्या 13 दिवसात मास्क न वापरणाऱ्या 9 हजाहून अधिक लोकांवर कारवाई केली आहे. तर एप्रिलपासून आत्तापर्यंत 14 हजारहून अधिक नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून पालिकेने 52 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड वसूल केला जात असला तरी मास्क न वापरणारे नागरीक दिसतच आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरीकांच्या या सवयीबद्दल संताप व्यक्त केला. अति आत्मविश्वास असलेले 1 ते 2 टक्के नागरीक मास्क न लावता इतरांच्या जिवाशी खेळत आहेत. 98 टक्के लोकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. ज्यांच्या घरात मृत्यू होतो, त्यांना याचा त्रास होतो, असंही महापौर म्हणाल्या.

राज्यात आता अनलॉक होतंय. या पार्श्वभुमीवर आता अधिक सावध राहाण्याची गरज आहे. लोकांनी मास्क न लावल्यास कोरोनाला हरवण्यास खूप वेळ लागेल असेही महापौरांनी नमुद केले.

महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय

( संपादन - सुमित बागुल )

those who dont wear mask are potential killer says BMC mayor kishori pednekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: those who dont wear mask are potential killer says BMC mayor kishori pednekar