मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. या भागात अनेक भाग जलमय झाला आहे. आतापर्यंत तलावक्षेत्रांमध्ये 164 ते 264 मि.मी. पावसाची नोंद झाली.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

मुंबई-  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. या भागात अनेक भाग जलमय झाला आहे. आतापर्यंत तलावक्षेत्रांमध्ये 164 ते 264 मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. भातसा धरणक्षेत्रात 264 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भातसा तलाव हे मुंबईकरांची तहान भागविण्यात महत्त्वाचं आहे.

काय सांगता! नवरदेव थेट पीपीई कीट घालून बोहल्यावर, कुठे झालाय हा विवाह

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे 16 जूनला तलावांमध्ये एक लाख 75 हजार 791 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून पुढचे 50 दिवस मुंबईकरांना हे पाणी पुरेल. गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये 9 हजार 997 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, विहार व तुळशी या तलावात पावसाने हजेरी लावली असून आतापर्यंत तलावक्षेत्रांमध्ये 164 ते 264 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक शुल्क कमी होणार? शिक्षणमंत्र्यांनी ही दिली माहिती

दररोज 5000 ते 6 दशलक्ष लिटर पाणी बचत कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन आणि संचारबंदी होती. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात तरणतलाव, पंचतारांकित हॉटेल, इमारत बांधकाम, खासगी कंपन्यांची कार्यालये बंद होती. केवळ सरकारी कार्यालयांमध्ये मर्यादित संख्येने कर्मचारी उपस्थित असायचे. ही बाब लक्षात घेता प्रतिदिन 500 ते 600 दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

यावर्षी आतापर्यंत तलाव क्षेत्रात पडलेला पाऊस ( मिमीमध्ये)

अप्पर वैतरणा 227
तानसा 184
मोडकसागर 201
भातसा 264
मध्य वैतरणा 216
विहार 195
तुळशी 164

loading image
go to top