esakal | ऐन कोरोनाच्या काळात राज्यावर येणार 'हे' संकट..
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन कोरोनाच्या काळात राज्यावर येणार 'हे' संकट..

महाराष्ट्रात सध्या  कोरोनानं हाहाकार माजवला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यात आता महाराष्ट्रावर आणखी एक संकट येण्याचं चिन्हं आहे. 

ऐन कोरोनाच्या काळात राज्यावर येणार 'हे' संकट..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रात सध्या  कोरोनानं हाहाकार माजवला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यात आता महाराष्ट्रावर आणखी एक संकट येण्याचं चिन्हं आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

राज्यात दिवसागणिक उकाडा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसात तर राज्यात उष्णेतेची लाट पसरली आहे. मात्र आता येणाऱ्या ५ दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे. वातावरणातल्या बदलांमुळे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो असं वेधशाळेनं म्हटलं आहे.

हृदयद्रावक ! कसाबला फाशीच्या दारात पोहोचवणारा 'तो' सध्या काय करतोय?  

या वातावरण बदलाचा मोठा फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे आंबे झाडाला लागले आहेत. तसंच द्राक्ष आणि संत्रही झाडाला लागले आहेत. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान होण्याची चिन्हं आहे.

वेधशाळेनं सांगितल्याप्रमाणे ७ मे ते १० मे त्या कालावधीत राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. यात हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

maharashtra to face unseasonal rain in coming days read where it will have most impact

loading image