चांगली बातमी आली, 2021 'नो' कोरोना वर्ष; 8 महिन्यांनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी नवीन रुग्णांची नोंद

चांगली बातमी आली,  2021 'नो' कोरोना वर्ष; 8 महिन्यांनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी नवीन रुग्णांची नोंद

मुंबई 19 : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. यातून राज्याला जरी दिलासा मिळत असला तरी चाचण्यांचे प्रमाण जास्त वाढवणे गरजेचे असल्याचे मत काही तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात. जेणेकरुन कोरोनाचे रुग्ण आणखी सापडतील आणि त्यांच्यावर उपचार करता येतील. शिवाय, संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होईल. त्यामुळे, लोकांनी ही चाचण्या करण्यासाठी पुढाकर घ्यावा असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. सोमवारी एप्रिल महिन्यापासून शहरात दररोजच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट दिसून आली असून सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी 395 नवीन रुग्णांची आणि सात कोविड मृत्यूंची नोंद झाली असून मुंबईतील रुग्णसंख्या 3,03,148 तर मृत्यूंची संख्या 11,249 वर पोहोचली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात एप्रिल 2020 पहिल्यांदाच 2000 पेक्षा कमी प्रकरणे नोंदली गेली. 1,924 नवीन प्रकरणे आणि 35 कोविड मृत्यूंसह आतापर्यंत एकूण संख्या 19,92,683 वर पोहचली असून आतापर्यंत 50,473 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घट होण्यामागचे कारण म्हणजे आठवड्याच्या शेवटी झालेल्या कोविड चाचण्यांच्या संख्येत कमतरता आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

शिवाय, मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 409 दिवसांवर म्हणजे साधारणत: दिड वर्षावर गेला आहे. तर, दैनंदिन रुग्ण वाढीचा दर 0.21 इतका आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा कालावधी कायम असून 94 टक्के इतका झाला आहे. तर, सक्रिय प्रकरणेही 7,000 च्या खाली गेली आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात सक्रिय प्रकरणेही घसरून 50,680 वर आली आहेत.

मुंबईत कोरोना व्हायरसच्या मृत्यूंची गेल्या 18 ते 20 दिवसांपासून एकअंकी नोंद होत आहेत. रविवारी झालेल्या सात मृत्यूंपैकी, पाच रुग्णांना इतर व्याधी होते, तर सहा 60 वर्षांवरील होते. आज जवळपास दोन महिन्यांपासून 500-600 दरम्यान राहिलेल्या पॉझिटिव्ह घटनांमध्ये कोणतीही घट झाली नाही. 

वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, चाचणीत घट झाली आहे. जर जास्त लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या तर केसेस वाढलेल्या दिसतील. एका पालिका अधिका-याने सांगितले की, पॉझिटिव्हीटीचे प्रमाण सारखेच असून जवळपास 5 टक्के आहे. तर, दररोज किमान 15000 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेत आहोत आणि दैनंदिन चाचणीत कोणतीही घट झालेली नाही,” असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

good news record of lowest number of corona patients detected after eight months 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com