माथेरानच्या शटल सेवेला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद; 36 दिवसात 14 लाखांची कमाई

माथेरानच्या शटल सेवेला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद; 36 दिवसात 14 लाखांची कमाई
Updated on

मुंबई : कोरोनाच्या पाश्वभुमीवर बंद असलेल्या माथेरानच्या शटल सेवेला प्रवाशांसाठी पुन्हा तब्बल आठ महिन्याने सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 36 दिवसांमध्ये सुमारे 23 हजार 414 प्रवाशांनी प्रवास करून, तब्बल 14 लाख 73हजार 503 रुपयांच्या महसुलाची मध्य रेल्वेने कमाई केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनलॉक मध्ये माथेरानची शटल सेवा 4 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली असून चार सेवा सध्या सुरू आहे.  अद्याप कोविड 19 ची परिस्थिती असतानाही अमन लॉज - माथेरान विभागात चालणा-या 12 शटल सेवांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. अमन लॉज - माथेरानची सेवा केवळ पर्यटकांनाच आकर्षित करीत नाही तर माथेरानमधील रहिवाश्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आवश्यक वाहतुकीचे साधन ठरत आहे.

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी पाहून मध्य रेल्वेने 14 नोव्हेंबर अमन लॉज आणि माथेरान दरम्यान आणखी 4 सेवा चालविण्याचा निर्णय घेतला.  यानंतरही प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने 18 नोव्हेंबर रोजी पुन्हा  चार सेवा वाढवून एकूण 12 सेवा सध्या सुरू आहे.

good response from tourists to Matherans shuttle service Earned Rs 14 lakh in 36 days

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com