Good Samaritan: अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्याला मिळणार पुरस्कार; सरकारची घोषणा

राज्य शासनानं स्थापन केली समिती
Road Accident
Road Accident Sakal
Updated on

मुंबई : मोटार अपघातग्रस्तास सुरुवातीच्या काही तासात हॉस्पिटल्स किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घेऊन जाणाऱ्या ‘गुड समेरिटन’ला अपघातग्रस्ताचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. (Good Samaritan an award given to person by Maharashtra govt who helps an accident victim)

केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने अपघाताच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेणाऱ्या गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरित करतात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Road Accident
Baba Ramdev: "संन्यासी आहात तर बायकांकडे बघता कशाला"; विद्या चव्हाण बरसल्या

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने या पुरस्कार योजनेबाबत ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश काढले होते. ही मार्गदर्शक तत्वातील परिच्छेद ७.३ व ७.५ अन्वये राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करणे सक्तीचे आहे. गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्याबाबतच्या या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा बैठक घेण्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य शासनानं पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पुरस्कारासाठी असे असतील निकष

  1. अपघाताच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना हॉस्पिटल्स, ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या गुड समेरिटनला पुरस्कार देण्यात येणार

  2. या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा बैठक घेण्याकरीता राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात येत आहे.

  3. या योजनेच्या प्रभावी व कार्यक्षम अंमलबजावणीचा आढावा वेळोवेळी त्रैमासिक बैठकीद्वारे घेईल.

  4. तसेच राज्यस्तरीय देखरेख समिती राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी वार्षिक आधारावर राज्यातील तीन सर्वात योग्य नामांकनांचे प्रस्ताव पुढे पाठवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com