"संन्यासी आहात तर बायकांकडे बघता कशाला"; विद्या चव्हाण बरसल्या : Baba Ramdev | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baba ramdev

Baba Ramdev: "संन्यासी आहात तर बायकांकडे बघता कशाला"; विद्या चव्हाण बरसल्या

मुंबई : महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या योग गुरु बाबा रामदेव हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात विविध स्तरातून टीका होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. सन्यासी आहात तर बायकांकडे बघता कशाला? अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. (Baba Ramdev controversial statement about women Vidya Chavan Slams him)

हेही वाचा: Sanjay Raut: राऊतांविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्या न्यायाधीशांचा नकार; ईडीची पळापळ

विद्या चव्हाण म्हणाल्या, "हे अतिशय धक्कदायक विधान आहे. हा स्वतःला बाबा समजोय, भगवी वस्त्रे परिधान करतो. करोडोनं सरकारी जागा बळकावतो. उद्योगधंदे सुरु करतो. सिनेमातील हिरोईन्स याच्याकडं योगासनं शिकतात आणि हा बाब अशा प्रकारे महिलांबाबत बोलतो. तिथं उपस्थित महिलांनी त्याला तिथंच झोडपून काढायला हवं होतं. एका भगवे वस्त्र परिधान केलेल्या बाबाला हे शोभत नाही. हा सन्यासी आहे तर बायकांकडे बघतो कशाला?"

हेही वाचा: Ajit Pawar on Marathwada: 'स्वतंत्र मराठवाडा'च्या मागणीवर अजित पवारांचं भाष्य; म्हणाले...

अनेक पुरुषांची महिलांबाबत वादग्रस्त विधानं मी ऐकली आहेत. पण असं खालच्या पातळीवरच विधान कुणीही केलं नव्हतं, ते ही एका सन्याशी माणसानं अशा प्रकारचं विधान केलेलं मी ऐकलं नव्हतं. कारण असं विधान अत्यंत चीड आणणार, संताप आणणार आहे. याचे कुठलेही प्रॉडक्ट महिलांनी वापरु नयेत. कारण हा बदमाश बाबा आहे. हा भगवी कपडे घालतो सन्यासी दाखवतो परंतू एक डोळा लूक लूक करतो ना त्यातून तो बायकांकडे पाहतो हे आता सिद्ध झालेलं आहे, असंही चव्हाण यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

बाबा रामदेव यांची जीभ घसरलेली नाही - चव्हाण

हा प्रकार म्हणजे बाबा रामदेवची जीभ घसरलेली नाही, त्याची नजर वाईट आहे. त्याचा बायकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वाईट आहे. महाराष्ट्रात आल्यावर याला चोप दिला जाणार आहे. देशातील महिलांनी याच्या प्रॉडक्सटवर बंदी घातली पाहिजे, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नेमकं घडलं काय?

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.

यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत. मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा" असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.