

Sukeli Khind Toll Plaza
ESakal
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत उभारण्यात आलेला टोलनाका आता सुरू होणार नसल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. गणेशोत्सवानंतर टोलवसुली सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अंतिम तयारी सुरू होती; मात्र टोलनाक्याला कोकणवासीयांकडून विरोध होत असताना तटकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत सुकेळी टोलनाका कार्यान्वित केला जाणार नसल्याचे आश्वासन मिळाल्याचे तटकरे यांनी गुरुवार (ता. २०) अलिबाग येथे पत्रकार परिषदेत सांगितले.