esakal | आता पत्रकारांच्या पाठीशी 'गुगल', उचललं 'हे' मोठं पाऊल...
sakal

बोलून बातमी शोधा

आता पत्रकारांच्या पाठीशी 'गुगल', उचललं 'हे' मोठं पाऊल...

कोरोनामुळे डबघाईला आलेल्या न्युज पब्लिशर्ससाठी  गुगल आलं धावून; उचललं 'हे' मोठं पाऊल...

आता पत्रकारांच्या पाठीशी 'गुगल', उचललं 'हे' मोठं पाऊल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जगात  सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे आणि व्यवसाय प्रभावित झाले आहेत. लॉकडाऊनमुळे छोट्या आणि मध्यम स्वरूपाचे News Publishers डबघाईला आले आहेत. मात्र गुगल कंपनीनं या न्युज पब्लिशर्सची मदत करण्यासाठी मोठं आणि कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.

जे छोट्या आणि मध्यम स्वरूपाचे  न्युज पब्लिशर्स आहेत त्यांना गुगल आर्थिक मदत करणार आहे.  त्यासाठी गुगलनं अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे न्युज पुब्लिशर्सवर आलेल्या आर्थिक संकटाला कमी करण्यासाठी गुगलनं  लोकल न्यूजरूम्सना पैसे देण्याची घोषणा केली आहे. गुगल न्युज इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे पैसे देण्यात येणार आहे.

मोठी बातमी - मंदीच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करायचंय ? मॉन्स्टरने लॉन्च केलं भन्नाट फिचर...  

हे पैसे देण्यासाठी गुगलनं  'जर्नालिज्म रिलीफ फंड' बनवला आहे. यामध्ये लहानापासून तर मोठ्या न्युज पब्लिशर्सना गुगलकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र यासाठी गुगलकडून नक्की किती पैसे दिले जाणार आहेत याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.

"लॉकडाउनच्या काळात लोकांना सतत माहिती पुरवण्यामध्ये लोकल न्युज पब्लिशर्सचा मोठा वाटा आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आलेल्या आथिर्क संकटामुळे काही न्युज पब्लिशर्स डबघाईला आले आहेत. म्हणून गुगलनं त्यांना मदत करायचं ठरवलं आहे",असं गुगलचे व्हाईस प्रेसिडंट रिचर्ड यांनी म्हंटलंय.

मोठी बातमी -  वरळीनंतर मुंबईतील 'या' भागांमध्ये सापडतायत कोरोना रुग्ण, तुम्ही इथं राहात असाल तर पूर्ण काळजी घ्या...

असा करा अर्ज:

  • गुगलनं यासंबंधित  फंडिंग करायला सुरुवात केली आहे. यात गुगलनं न्युज पब्लिकेशन्सकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. हे अर्ज २ आठवड्यांच्या आत गुगलकडे सोपवणं अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख २९ एप्रिल असणार आहे.
  • https://newsinitiative.withgoogle.com/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
  • मात्र कोणते न्युज पब्लिशर्स अर्ज करणार यासाठी गुगलनं नियमावली जाहीर केली आहे.

हे न्युज पब्लिशर्स करू शकतात अर्ज:

  • ज्या पब्लिशर्सकडे २ ते १०० पूर्ण वेळ काम करणारे जर्नालिस्ट आहेत ते अप्लाय करू शकतात.
  • News Publication डिजिटल माध्यमात १२ महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून असलं पाहिजे.
  • १०० पेक्षा जास्त जर्नालिस्ट असलेले पब्लिशर्सही यात अप्लाय करू शकतात.
  • गुगल अशा पब्लिकेशन्सची माहिती काढल्यानंतर त्यांना फंडिंग करणार आहे.

Google.org कडून पत्रकारांना मदत करणाऱ्या दोन संस्थांना १ मिलियन डॉलर्स देण्यात येणार आहेत. यात इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स आणि कोलंबिया जर्नलिस्म स्कूल, डार्ट सेंटर फॉर जर्नलिज्म अँड ट्रॉमा या संस्थांचा समावेश आहे.

google to start giving journalism relief fund read how to apply

loading image