esakal | मंदीच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करायचंय ? मॉन्स्टरने लॉन्च केलं भन्नाट फिचर...  
sakal

बोलून बातमी शोधा

मंदीच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करायचंय ? मॉन्स्टरने लॉन्च केलं भन्नाट फिचर...  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊ आहे. शाळा, महाविद्यालयं, ऑफिस सगळं काही बंद आहे. लोकांना आपल्या घरातच राहण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातंय. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेक जणांना पगार मिळू शकत नाहीये. त्यामुळे असे लोकं जॉब्सच्या शोधात ऑनलाईन नोकरी देणाऱ्या वेबसाईटवर जॉब शोधत आहेत.

मंदीच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करायचंय ? मॉन्स्टरने लॉन्च केलं भन्नाट फिचर...  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊ आहे. शाळा, महाविद्यालयं, ऑफिस सगळं काही बंद आहे. लोकांना आपल्या घरातच राहण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातंय. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेक जणांना पगार मिळू शकत नाहीये. त्यामुळे असे लोकं जॉब्सच्या शोधात ऑनलाईन नोकरी देणाऱ्या वेबसाईटवर जॉब शोधत आहेत.

मोठी बातमी - डिटेल नियमावली जाहीर; २० एप्रिलपासून काय सुरु, काय बंद... वाचा

त्यामुळे 'मॉन्स्टर' या  इंटरनेटवर नोकरीची माहिती देणाऱ्या वेबसाईटनं आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फिचर तयार केलं आहे. ज्यामुळे वर्क फ्रॉम होम करू इच्छिणाऱ्या लोकांना monster.com वर नोकरीची माहिती मिळवणं सोपं होणार आहे. तसंच कंपन्यांनाही अशा लोकांना नोकरी देता येणार आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नोकरीची माहिती देणाऱ्या वेबसाईट्सवर तब्बल  ६० टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होमसाठीच्या नोकरीची मागणी केली आहे. गूगल ट्रेंड्सवर या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असल्यामुळे मॉन्स्टरनं त्यांच्या यूजर्ससाठी हे फिचर सुरु केलंय.

मोठी बातमी - वरळीनंतर मुंबईतील 'या' भागांमध्ये सापडतायत कोरोना रुग्ण, तुम्ही इथं राहात असाल तर पूर्ण काळजी घ्या...

"मॉन्स्टर नेहमीच आपल्या युजर्ससाठी काहीतरी नवीन आणि त्यांच्या फायद्याचं फिचर घेऊन आलं आहे.आम्ही आमच्या यूजर्सच्या गरजेप्रमाणे फिचर आणत असतो तसंच त्यांच्या सर्व समस्यांवर आमचं लक्ष असतं. हे नवीन फिचर आमच्या यूजर्सना नोकरी मिळवण्यासाठी एक वरदान ठरणार आहे. आम्ही आमच्या यूजर्सपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत",असं मॉन्स्टरचे सीपीओ अंशुमन  मिश्रा यांनी म्हंटलंय.

दरम्यान ज्यांना घरून काम करण्याची खरंच इच्छा आहे किंवा ज्यांना पार्ट टाईम काम करायचा आहे त्यांच्यासाठी मॉन्स्टरनं लाँच केलेलं हे नवीन फिचर फायद्याचं ठरणार आहे.

job site monster launches unique feature for those who want to work from home

loading image
go to top