

Goregaon Tribal Land
ESakal
'पाण्यात राहून मासा तहानलेला' या उक्तीचा प्रत्यय आज मुंबईसारख्या मायानगरीत येत आहे. ज्यांच्या पायाखाली करोडोंची जमीन आहे, असे आपले आदिवासी भूमिपुत्र आजही अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडले आहेत. गोरेगाव-मालाड पट्ट्यातील (फिल्म सिटी रोड) तब्बल साडेचार एकर मोक्याच्या आदिवासी जमिनीवर ज्योती बिल्डर्स बॅनरखालील खासगी विकसकाने डल्ला मारला आहे.