
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) हद्दीत राहणाऱ्या आदिवासी आणि अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबांना अविकसीत क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) म्हणून निश्चित केलेल्या जमिनीवर पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरी विकास विभागाने , विकास नियंत्रण नियमावली, २०३४ अंतर्गत नियम ३४ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रहिवाशांना अविकसीत क्षेत्र जमिनीवर स्थलांतरित करता येणार असून याबाबातची अधिसूचना जारी करत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या.