मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वाला अनुसरून सुशोभीकरणासाठी काळ्या पाषाणाचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या प्राचीन स्थापत्यशैलीशी जुळणाऱ्या कलाकृती आणि आधुनिक सुविधा यांचा समन्वय साधून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
उल्हासनगर : शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिराचा (Shiv Temple) परिसर आता नव्या स्वरूपात विकसित होणार आहे. राज्य सरकारने १३८ कोटींचा निधी मंजूर करून या ऐतिहासिक मंदिराच्या सुशोभीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. हे मंदिर लवकरच एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणार आहे.