
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील नविन पलावा उड्डाण पुलाचे नुकतेच उदघाट्न होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र दोन तीन दिवसांतच पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पुलाची दुरावस्था झाली आहे. मनसेचे नेते राजू पाटील यांनी या पुलाची पाहणी करत कामाची गुणवत्ता ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. तसेच पुलाच्या कामाचे व्हीजेटीआय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. शासनाने त्यास मंजुरी दिली आहे.