
ठाणे : एक नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, चार कामगार संहिता तात्काळ रद्द करा, पीएफ आरडीए कायदा रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी देशातील प्रमुख अकरा संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपास सक्रिय पाठिंबा देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे हल्लाबोल आंदोलन करत जोरदार निदर्शने केली.