

School Rules for students
ESakal
मुंबई : बालकांच्या सुरक्षा आणि शिक्षण हक्क याची अधिकार अबाधित राहण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा व मानसिक छळ आदी करण्यास यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा, शाब्दिक अपमान, अवहेलना तसेच जात, धर्म, लिंग, अपंगत्व, भाषा किंवा शैक्षणिक कामगिरीच्या आधारे भेदभाव करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून या शासन निर्णयाची राज्यातील शासकीय अनुदानित आणि खाजगी व्यवस्थापनांच्या सर्वच शाळांमध्ये एकसमान अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे.