

Disabled Persons
मुंबई : राज्यातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, हक्क, सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाकडून विविध प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत कलम ७९ ते ८३ नुसार आयुक्त, दिव्यांग कल्याण यांना ‘राज्य आयुक्त’ म्हणून अधिसूचित करण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत.