पोस्ट कोव्हीड रुग्णांकडे प्रशासनाचे दूर्लक्ष, उपनगरांतील बरे झालेले रुग्ण वाऱ्यावर

सुजित गायकवाड
Saturday, 29 August 2020

कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दीर्घकाळ थकवा, फुफ्फुसांची खालावलेली क्षमता, एकटेपणामुळे आलेला माणसिक ताण, निरुत्साह आदी प्रकारची भयानक लक्षणे रुग्णांना जाणवत आहेत. परंतू अशा परिस्थितीत उपनगरांतील सरकारी आस्थापनांनी बऱ्या झालेल्या रुग्णांकडे सपशेल दूर्लक्ष केले आहे. एकदा काय, रुग्ण बरा होऊन घरी गेला की पुन्हा त्याच्या प्रकृतीची महापालिकांकडून चौकशी केली जात नाही. त्यामुळे ही लक्षणे अतिउच्च टोकाला पोहोचल्यास आजारांची मोठी लाट येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. 

संपूर्ण जगासाठी नवीन असणाऱ्या कोरोना विषाणूंच्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. या आजारावर मात करण्यासाठी एकीकडे लसीवर काम सुरू आहे. असे असताना सद्या कोणताच उपचार उपलब्ध नसल्याने मृत्युच्या दाढेत असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी त्यांना अॅन्टीबायोटीक्स, इन्जेक्शन, प्लाझ्मा थेरपी आदी विविध प्रयोग रुग्णांवर केले जात आहेत.

आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक

यातून कसेबसे रोगप्रतिकारक शक्तीच्या आधारावर काही रुग्ण बरे होत आहेत. कोरोनातून मरणाऱ्यांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. परंतू या बरे झालेल्या रुग्णांना विविध शाररीक आजारांना सामोरे जावे लागत आहे. बरे झालेल्या रुग्णांना दिर्घकाळ थकवा जानवणे, सतत निरुस्ताह, फुफ्फुसाची क्षमता कमी होणे, रक्तात गुठळ्या होणे, माणसिक ताण येणे आदी प्रकारचे आजार दिसून येत आहेत.

हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयाच्या इंटर्नल मेडीसीन विभागाच्या संचालक डॉ. फराह इंगळे यांच्यामते बरे झालेल्या 70 टक्के रुग्णांमध्ये थकवा जाणवतो, 60 टक्के रुग्णांमध्ये माणसिक ताण आणि 30 टक्के रुग्णांची फुफ्फुसाची क्षमता कमी झाले आहे. त्याकरीता हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयातर्फे वाशीमध्ये पोस्ट कोव्हीड 19 पुर्नवसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना वेग-वेगळे आजार होत असल्याने त्यांना वेळीच उपचार केल्यास ते यातून सुटका होऊ शकते. मात्र त्यांच्याकडे दूर्लक्ष केल्यास वेग-वेगळ्या आजारांची लाट येण्याची शक्यता जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे. परंतू अद्यापही उपनगरांमधील महापालिकांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.

ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेल आदींसह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील नगरपरीषदांकडून रुग्णांकडे दूर्लक्ष केले जात आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला की त्याला घरी सोडून दिले जाते. मात्र घरी सोडल्यानंतर दैनंदिन त्या रुग्णासोबत संवाद साधला जात नाही. रोजच्या आयुष्यात कोण-कोणते शाररीक होणारे बदल व त्रासाबाबत चौकशी केली जात नाही. त्यामुळे विवीध त्रास असणारे रुग्ण घरात एका कोपऱ्यात पडून राहीलेले दिसून येत आहे. 

27 ऑगस्टपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी

  • रायगड जिल्हा - 21 हजार 791
  • नवी मुंबई - 20 हजार 653
  • पनवेल महापालिका - 9 हजार 656  

हेही वाचा :  लोकल प्रवासात चोरी झालेली सोन्याची चेन तब्बल 27 वर्षानंतर मिळाली

घरी गेलेल्या रुग्णांची कशी काळजी घ्याल

कोरोनातून बरे होण्यासाठी काही रुग्णांना अँटीबायोटीक्स गोळ्या व इन्जेक्शन दिले जातात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. तज्ञांच्या मते हे तपासण्यासाठी रुग्णांची डिस्चार्ज दिल्यानंतरच्या सात दिवसांत विविध चाचण्या करायला हव्यात, रुग्णांच्या प्रगतीचे मूल्यमापन, संभाव्या परिणामांची तिव्रता तपासण्या करायला हव्यात. रक्ताची चाचणी, ईसीजी, छातीचा एक्सरे, लिव्हर प्रोफाईल आदी चाचण्या करणे गरजेच्या आहेत.

याबाबत बोलताना राष्ट्रीय आरोग्य अभियान चे संचालक डॉ. एन. रामास्वामी म्हणालेत, कोव्हीड 19 मधून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात झालेल्या वेग-वेगळ्या बदलांमुळे त्रास होत असल्याने मुंबई सेव्हन हिल्स रुग्णालयात पोस्ट कोव्हीड पूर्नवसन केंद्र सुरू केले आहे. त्याच धर्तीवर उपनगरांमध्येही सुरू केले जावेत. यादृष्टीने प्रयत्न करता येतील. तशा पद्धतीने अभ्यास करून सुरू करण्याचा विचार केला जाईल. 

government is ignoring post covid patients no attention on cured covid patients in suburbs  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government is ignoring post covid patients no attention on cured covid patients in suburbs