esakal | उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यातील भूखंड पालिकेला हस्तांतरीत
sakal

बोलून बातमी शोधा

 Government owned land in Ulhasnagar Transferred to the corporation

बोटक्लब, इंदिरा गांधी मार्केट व बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल (पूर्वीचे व्हिटीसी मैदान) या तिन्ही भूखंडावर पालिकेने बांधकाम केलेले आहे. मात्र हे भूखंड शासनाच्या ताब्यात असल्याने त्याचा भव्य प्रमाणात विकास पालिकेला करता येत नाही.

उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यातील भूखंड पालिकेला हस्तांतरीत

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर - महापौर पंचम कलानी यांनी पदभार स्विकारण्याच्या दुसऱ्या दिवशीच उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यात असलेले तीन शासकीय भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे. गिरासे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे भूखंड विकसित करण्यासोबत रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

बोटक्लब, इंदिरा गांधी मार्केट व बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल (पूर्वीचे व्हिटीसी मैदान) या तिन्ही भूखंडावर पालिकेने बांधकाम केलेले आहे. मात्र हे भूखंड शासनाच्या ताब्यात असल्याने त्याचा भव्य प्रमाणात विकास पालिकेला करता येत नाही. याशिवाय कल्याण बदलापूर या महामार्गाच्या रुंदीकरणात शेकडो व्यापारी बाधित झाल्याने जर्जर अवस्थेत झालेले इंदिरागांधी मार्केट तोडून व त्याजागी भव्य व्यापारी संकुल उभारून व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलेला आहे. मात्र इंदिरा गांधी मार्केटच्या भूखंडाचा ताबा शासनाकडे असल्याने व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग खडतर बनू लागला होता.

पंचम कलानी यांनी महापौरांचा पदभार हाती घेताच, त्यांनी आमदार ज्योती कलानी, युथ आयकॉन ओमी कलानी, नगरसेवक राजेश वधारिया, नरेंद्रकुमारी ठाकूर यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांची भेट घेतली आणि शासकीय भूखंडांना उल्हासनगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी गिरासे यांना निवेदनाद्वारे केली. गिरासे यांनी सकारात्मक आश्वासन दिले. त्यानंतर गिरासे यांनी पालिका आयुक्त गणेश पाटील, महापौर पंचम कलानी यांची पालिकेत महापौरांच्या दालनात भेट घेतली आणि येत्या दहा पंधरा दिवसात या भूखंडांना सनद देण्याची पालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार, अशी माहिती दिली.

loading image