
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील वाहतूक क्षेत्राला अभुतपुर्व फटका बसला आहे. राज्य सरकारने या वाहतूकदारांना दिलासा देण्याचे ठरवले असून, एप्रिल- ते सप्टेंबर या सहा महिन्याचा रोड टॅक्स माफ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारचा आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर निर्णय अपेक्षीत आहे. हा निर्णय़ झाल्यास राज्यातील 11.41 लाख वाहनधारकांना याचा फायदा मिळणार आहे. तर शासकीय तिजोरीवर 700 कोटीचा बोजा पडणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता, इतर मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहनांची चाके थांबली होती. त्यामुळे टॅक्सी, टूरीस्ट कॅब, खाजगी आणि प्रवासी वाहने, स्कूल बस चालकांचे मोठे आर्थिक नूकसान झाले होते. या काळात अनेकांना आपली घर चालवणे कठिण होऊन बसले होते. उत्पन्नच नसल्यामुळे अनेक परप्रांतीय टँक्टीचालक आपआपल्या राज्यात निघून गेले. वाहने जागच्या जागीच थांबल्यामुळे रोड टॅक्ससह अन्य सवलती देण्याची मागणी वाहतूक क्षेत्रातून केली जात होती. त्यामुळे सरकारने हा प्रस्ताव तयार केला आहे.
यापुर्वी गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि हरीयाणा या राज्यांनी रोड टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यापुर्वी राज्य सरकारने 13 लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत बांधकाम मजूरांना प्रत्येकी 2 हजाराची थेट आर्थिक मदत केली होती. लॉकडाऊनमुळे नाजुक आर्थिक परिस्थिती झालेल्या 12 लाख आदिवासी बांधवांना सरकारने थेट मदतीचा हात दिला आहे.
( संकलन - सुमित बागुल )
government propose to give exemption of road tax for six months
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.