सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी -डॉ. अनिल बोंडे 

दीपक घरत
Monday, 19 October 2020

राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी कृषी मंत्री  डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

पनवेल - राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी कृषी मंत्री  डॉ. अनिल बोंडे यांनी पनवेल मधील गिरवले गाव येथे आयोजित किसान संवाद सभे दरम्यान केली आहे.

माहीम चौपाटीवर बहरतेय सुरूची बाग!  पालिकेकडून सुशोभीकरण; कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीपासून लवकरच मुक्तता

या वेळी बोलताना बोंडे यांनी राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला आहे.115 लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील त्याऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी करत, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जागरूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या विकासासाठी तीन विधेयके पारित करून शेतकऱयांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र विरोधक त्याचा अपप्रचार करत शेतकऱ्यांनी आणि जनतेची दिशाभूल करीत असल्याचा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.

BMC स्थायी समितीच्या बैठकीचा वाद आता उच्च न्यायालयात; मंगळवारी होणार तातडीने सुनावणी

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हंटले की, अन्नदात्याचा देशभरात सन्मान करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील शेतकरी दलालांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी त्यांना शेतीमालाची विक्री कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर केले. या विधेयकाला विरोधासाठी विरोध करत अपप्रचार विरोधी करत आहे. मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा ध्येय्य ठेवला आहे, त्यामुळे अनेक योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आखल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government should immediately provide financial assistance to the farmers without conducting a panchnama Anil Bonde