
"बंगल्यावर किती खर्च केला यावर मी बोलणार नाही. तुम्ही बंगल्यावर खर्च करता मग शेतकऱ्यांना का पैसे देत नाही"
मुंबई : एकीकडे कोरोनामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असताना राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची बाब समोर येतेय. सार्वजनिक बांधकाम विभागाने विरोधीपक्षनेत्यांच्या बंगल्यासह ३१ बंगल्यांच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्यात. मात्र निविदा सादर होण्याआधीच बंगल्यांमधील कामाला सुरवातही झालीये. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या एकूण ३१ बंगल्यांवर करोडोंचा खर्च करण्यात आला आहे. एकूण ३१ बंगल्यांवर जवळजवळ १५ कोटींचा खर्च करण्यात आले आहेत.
महत्त्वाची बातमी : आणखी किती दिवस थंडीत पडणार पाऊस ? हवामान खात्याने दिलं उत्तर
कोणत्या बंगल्यावर किती रुपयांचा खर्च :
दरम्यान याबाबत बोलण्यास महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिलाय. बंगल्यावर किती खर्च केला यावर मी बोलणार नाही. तुम्ही बंगल्यावर खर्च करता मग शेतकऱ्यांना का पैसे देत नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय.
government spent more than 15 crore on renovation of 31 bungalows reaction of devendra fadanavis