रायगडमध्ये सरकारी कामे ठप्प! 15 हजार कर्मचारी संपात सहभागी; नागरिकांचे हाल 

रायगडमध्ये सरकारी कामे ठप्प! 15 हजार कर्मचारी संपात सहभागी; नागरिकांचे हाल 

अलिबाग : केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारला. यामध्ये तब्बल 15 हजार कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे एरवी गजबजणाऱ्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता; तर नियमित कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे हाल झाले. 

लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी कामगार व छोटे उद्योग रोजगार बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर देशाच्या हितासाठी धोरणे आखणे आवश्‍यक होते; परंतु केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप संपात सहभागी झालेल्या संघटनांनी केला. 
या आंदोलनाद्वारे अलिबागमध्ये सरकारच्या कामगार धोरणाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप नागे, वि. हं. तेंडुलकर, प्रभाकर नाईक, रत्नाकर देसाई, परशुराम म्हात्रे, अरुण भांदुर्गे आदी पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आदी मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते. 

या संपाबाबत तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या काही नागरिकांना माहिती नव्हती. त्यामुळे ते सरकारी कामासाठी आले होते. कर्मचारी संपावर आहेत, हे समजल्यानंतर त्यांना हताश होऊन माघारी जावे लागले. 

रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपाचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला असून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने कामाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. 
- निधी चौधरी,
जिल्हाधिकारी, रायगड. 

 Government strike in Raigad 15 thousand employees participated in the strike

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com