
डाक विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक लाख रुपयांची मदत केली.
डाक विभागातील कोरोना बाधितांच्या मदतीसाठी राज्यपालांचा पुढाकार; एक लाख रुपयांची मदत...
मुंबई: डाक विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक लाख रुपयांची मदत केली.
राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्विकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.
मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...
डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते.
या रकमेत स्वत:चे 75 हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.
हेही वाचा: पहिला बांबू...सामनाच्या अग्रलेखातून चीनवर निशाणा
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या विषयावर आंतरदेशिय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषीक प्राप्त झाले होते.
governor of maharashtra helps corona patients in post department
Web Title: Governor Maharashtra Helps Corona Patients Post Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..