मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर आता नवी मुंबईचे नवे आयुक्त 

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

नवी मुंबई : महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडका-फडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त आयएएस अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात राज्य सरकारने अचानक मिसाळ यांची बदली केल्यामुळे महापालिका वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. 

अण्णासाहेब मिसाळ यांची जुलै 2019 ला तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून संवाद वाढवला. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मिसाळ यांना महापालिकेची सूत्रे स्वीकारून काही महिने न उलटले तेच कोरोना सारख्या आजाराने शहरात शिरकाव केला.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

या आजाराला नियंत्रण घालण्यासाठी मिसाळ यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले. शहरातील नागरिकांना कोरोनाबाधितांचा त्रास होऊ नये म्हणून पनवेल येथील इंडिया बुल्स सोसायटीत क्वारंटाईन केंद्र तयार केले. परंतु मिसाळ यांचा हा प्रयत्न काही राजकीय लोकांना आवडला नाही. राजकीय लोकांना विश्वासात न घेता मिसाळ यांनी क्वारंटाईन केंद्र शहराबाहेर हलवल्यामुळे राजकीय लोकांच्या मर्जीतील हस्तकांनी मिसाळ यांच्यावर टीका केली. केंद्रातील कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले.

BIG NEWS : मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..

मात्र वाशीत सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भव्य क्वारंटाईन केंद्र तयार करून मिसाळ यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. मात्र तरी देखील काही नाराज लोकांकडून मिसाळ यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरूच होते. मिसाळ यांना निवृत्त होण्यासाठी काही वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिका नियुक्ती देण्यात आली होती. मिसाळ यांना महापालिकेत जेमतेम एक वर्ष होत आला आहे.

अशा परिस्थितीत अचानक राज्य सरकारने मिसाळ यांची बदली केल्यामुळे शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. मिसाळ यांच्या जागेवर नवे आयुक्त म्हणून नागपूर येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त आयएएस अधिकारी अभिजित बांगर हे आता हे आता नवी मुंबई मनपा आयुक्त म्हणून काम सांभाळणार आहेत. 

after mumbai its navi mumbais turn NMMC commissioner transferred bhijit bangar will be new commissioner  

टॅग्स :Navi Mumbai