Gram Panchayat Results : चंद्रकांत पाटलांचा होम पिचवर पराभव, पराभवावर आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

सुमित बागुल
Monday, 18 January 2021

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका निकालांचा धुराळा उडताना पाहायला मिळतोय.

मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका निकालांचा धुराळा उडताना पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रात आज निकालाची रणधुमाळी पाहायला मिळतेय. जसजसे निकाल समोर येत आहेत, त्यासोबत आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येतेय. ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे. 

महत्त्वाची बातमी : जगात येताच त्यांना थेट विकलं जायचं; नवजात मुलीसाठी 60 हजार, मुलासाठी 1.5 लाख, मुंबईत रॅकेटचा पर्दाफाश!

आदित्य ठाकरे याबाबत बोलताना म्हणालेत, "आता मी तेच आकडे पाहत होतो. अजून निकाल येणं बाकी आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटीलांच्या स्वतःच्या गावात भाजपचा प्रभाव झाला आहे याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. यावर आदित्य ठाकरे म्हणालेत की, "जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यामंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सर्वच महाविकास आघाडी सरकारवर आहे. ज्याप्रकारे आपण संवेदनशील पद्धतीने कोरोनाची परिस्थिती सांभाळली, इतरही सर्व विषय ज्याप्रकारे महाविकास आघडी हाताळत आहे, त्यानंतर शहरातील आणि  गावातील सर्वच जनतेचा महाविकास आघाडी सरकारवर लोकांचा विश्वास ठाम आहे" असं आदित्य ठाकरे म्हणालेत.  

महत्त्वाची बातमी : खासगी वाहनातून फिरताना आता मास्क न लावता बिनधास्त फिरा, कारवाई होणार नाही

आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिका  काँग्रेस स्वबळावळ लढवण्याचा विचार करत असल्याचं देखील विचारलं गेलं. यावर येत्या काळात याबाबत बोलू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. 

Gram Panchayat  Results reaction of aaditya thackeray on defeat of chandrakant patil 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Results reaction of aaditya thackeray on defeat of chandrakant patil