GrampanchayatElectionResult | रायगडमधील रोहा तालुक्‍यात शिवसेना - भाजपाची मुसंडी

GrampanchayatElectionResult | रायगडमधील रोहा तालुक्‍यात शिवसेना - भाजपाची मुसंडी

अलिबाग : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रोहा तालुक्‍यातील आकाराने मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपाने मुसंडी मारली. रोह्यात 21 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी 12, शिवसेना आणि भाजप सहा, मगर गट एक, शेकाप दोन ग्रामपंचायत जागांवर पक्षांचे अधिकृत उमेदवार विजयी झाले. भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी- शेकापने सर्व ताकद लावली होती. परंतु शिवसेनेच्या मदतीने भाजपाने रोहा तालुक्‍यात शिरकाव केला आहे. याचे पडसाद आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उमटणार असल्याचे मत राजकिय विश्‍लेषकांचे आहे. 

राष्ट्रवादीच्या ताब्यातील ऐनघर, वाशी, निडी तर्फे अष्टमी, रोठ बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारले. त्यामुळे या ग्रामपंचायती शिवसेना-भाजपा यांच्या ताब्यात गेल्या आहेत. तसेच शेकापच्या ताब्यातील शेणवई, वावे-पोटगे या ग्रामपंचायतीत मतदारांनी परिवर्तन करत शिवसेनेच्या हेमंत देशमुख गटाला विकास करण्यासाठी संधी दिली आहे. तेथील शेकापच्या गणेश मढवी गटाला मतदारांनी कंटाळून हेमंत देशमुख गटाला स्वीकारले. त्याचप्रमाणे वाशी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला. त्याठिकाणी अनेक वर्षे संघर्ष करत असलेल्या सुरेश मगर गटाने विजय मिळविला. एकंदरीत रोह्यातील राष्ट्रवादी गटांमधील अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला पाच ग्रामपंचायतीवर पराभव पत्करावा लागला. 

पक्षातील अंतर्गत श्रेयवाद अखेर राष्ट्रवादीच्या पदरात निराशा देऊन गेल्याने आता आगामी निवडनुकांमध्ये याचे पडसात नक्कीच उमटणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. वरसे ग्रामपंचायतीतील सर्वेसर्वा मधुकर पाटील फक्त आपले उमेदवार बिनविरोध विजयी करण्यात यशस्वी झाले आहेत. विशेषतः वाशी ग्रामपंचायतीत सुरेश मगर गट यांनी सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविल्यानंतर त्यांचीच चर्चा रोह्यात होत आहे. याशिवाय सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी व शेकापच्या हातातून निसटल्याचे शल्य नक्कीच कार्यकर्त्यांच्या मनात राहील असे बोलले जात आहे. 
पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या मतदार संघातील निडी तर्फे अष्टमी, रोठ बुद्रुक व ऐनघर ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्याने आता रोहा तालुक्‍यात भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

GrampanchayatElectionResult Shiv Sena-BJPs victory in Roha taluka in Raigad

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com