
Mumbai News : मुंबईत जैन समजाचा भव्य मोर्चा...
मुंबई : झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखर तीर्थ हे पर्यटन स्थळ बनवण्याची घोषणा केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. मुंबई येथील सकल दिगंबर जैन समाजाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली त्याचा विरोध करत मोर्चाचे आयोजन केले.
1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून व्हीपी रोड ते ऑगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढण्यात आला.या रॅलीत सकल दिगंबर जैन समाज, श्वेतांबर जैन मूर्तीपूजक समाज, श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज, श्वेतांबर तेरापंथी जैन समाज आणि इतर संघटनांशी संबंधित लोक सहभागी झाले होते.
श्रीदिगंबर जैन ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जमनालाल जैन सुद्धा उपस्थित होते. जैन समाजातर्फे सोशल मीडियावरही विशेष मोहीम राबवत आहे. श्रीसम्मेद शिखर तीर्थ वाचवण्यासाठी 21 जानेवारी रोजी मेगा रॅलीचे आयोजन केले आहे.
ही महारॅली सकाळी ९ वाजता मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानावर पोहोचेल, तिथे तिचे धार्मिक सभेत रूपांतर होईल. सरकारने आपला निर्णय तात्काळ मागे घेऊन श्री सम्मेद शिखर हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मुंबईतील जैन समाजाची मागणी आहे.
झारखंड सरकारने ज्या प्रकारे श्रीसम्मेद शिखराला पर्यटन स्थळ बनवण्याची तयारी केली आहे. श्री सम्मेद शिखर हे जैन धर्माचे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हा जैन धर्मीयांच्या भावनांवरचा हल्ला आहे. याविरोधात संपूर्ण जैन समाज एकवटला असल्याचे मोर्च्यात सहभागी व्यक्तींच्या भावना होत्या.