esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या आंबेडकर स्मारकातील पायाभरणीचा सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या आंबेडकर स्मारकातील पायाभरणीचा सोहळा

उद्या मुंबईतील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या आंबेडकर स्मारकातील पायाभरणीचा सोहळा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : उद्या मुंबईतील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. याच इंदू मिलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २०१६ रोजी पार पडलं होतं. दरम्यान, उद्या या स्मारकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.   

महत्त्वाची बातमी सरकारने काढला GR, आता 'सारथी'ची जबाबदारी अजित पवारांकडे

उद्या दुपारी तीन वाजता इंदूमिलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. याबाबत MMRDA कडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपच्या सत्तेत म्हणजे २०१६ मध्ये इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम पार पडला होता. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे.  त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील हा पहिला मोठा कार्यक्रम म्हणता येईल.

महत्त्वाची बातमी  धोक्याची घंटा ! राज्यात कोरोना बाधित मुलांची संख्या वाढती, लहान मुलांची संख्या 40 हजाराच्या पार

दादर येथील इंदू मिलमधील सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचं काम २०२२ मध्ये पूर्ण  होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यातील जमीन राज्य सरकारला दिली होती. पर्यावरण विभागाकडून परवानगी घेतल्यानंतर स्मारकाचे काम सुरू झाले. जमीन हस्तांतर प्रक्रिया, आंदोलने असा प्रवास झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दरम्यान उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 

grand memorial of dr babasaheb ambedkarcm uddhav thackeray foundation laying