सरकारने काढला GR, आता 'सारथी'ची जबाबदारी अजित पवारांकडे

सुमित बागुल
Thursday, 17 September 2020

सारथी सोबतच मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार आता अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे

मुंबई : सारथी सोबतच मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार आता अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने आज याबाबतचा GR जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची सर्व जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केलेली आहे.

मराठा समाजासाठीच्या योजना राबवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे होती. सारथी संस्थेची जबाबदारीही विजय वडेट्टीवार सांभाळत होते. मात्र, आज सरकारने याबाबतचा शासन निर्णय काढून सारथी सोबत मराठा समाजासाथीच्या योजना राबवण्याची सर्व जबाबदारी नियोजन विभाग म्हणजेच अजित पवारांकडे वर्ग केलेली आहे. 

महत्त्वाची बातमी - ड्रग्स प्रकरणी मुंबईत NCB चे एकाच वेळी विविध ठिकाणी छापे, गळाला लागलेत बडे मासे ?

गेल्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणावरून, मराठा समाजासाथीच्या बाळकटीकरणासाठीच्या सारथी संस्थेसाठी देण्यात येणाऱ्या निधीवरून, SEBC मधील विविध योजनांकडे दुर्लक्ष होतंय अशी चर्च रंगलेली. विजय वडेट्टीवार हे OBC समाजाचे नेते असल्याने त्यांच्यावर ही टीका देखील झाली. यानंतर स्वतः काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवर यांनी सारथीची सर्व जबाबदारी अजित पवारांकडे द्यावी असं सुचवलं होतं. मात्र याला काँग्रेसने विरोधही केला होता. सारथी काँग्रेकडे असल्याने सारथीची जबाबदारी विजय वडेट्टीवारांकडेच राहावी असाही काँग्रेसचा सूर होता. 

नुकतीच मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, आता सारथीची जबाबदारी आणि SEBC मधील योजनांची जबाबदारी नियोजन विभागाकडे म्हणजे अजित पवारांकडे गेल्याने निधीबाबतच्या अडचणी पुढील काळात उद्भवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र या निर्णयाला काँग्रेस कशाप्रकारे स्वीकारते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.   

now responsibility of sarthi will be handled by ajit pawar as head of planing department


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now responsibility of sarthi will be handled by ajit pawar as head of planing department