राणेंना हायकोर्टाचा दिलासा; पालिकेच्या नोटिशीवरील कारवाई तुर्तास टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane Adhish Bunglow
नारायण राणेंना मोठा दिलासा! पालिकेच्या नोटीशीवर तुर्तात कारवाई नको - हायकोर्ट

राणेंना दिलासा; बंगल्यावरील कारवाई तुर्तास टळली

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) आज (मंगळवार) तुर्तास दिलासा दिला. पालिकेनं दिलेल्या अनधिकृत बांधकामावर तुर्तास कारवाई करु नये, असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. (Great relief to Narayan Rane Mumbai High Court says No immediate action on BMC notic)

हेही वाचा: ... तर RSS ला जनाब संघ म्हणणार का? : संजय राऊत

हायकोर्टानं म्हटलं की, "मुंबई महापालिकेच्या नोटिशीला उत्तर देताना आपलं बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडं जो अर्ज केला आहे, त्यावर कायदेशीररित्या पालिकेनं सुनावणी घेऊन निकाल देणं बंधनकारक आहे. ती सुनावणी घेऊन त्यांनी तातडीनं निकाल द्यावा आणि हा निकालही नारायण राणेंच्या विरोधात गेला तर त्यावर तीन आठवड्यांपर्यंत कुठलीही कारवाई करु नये"

हेही वाचा: The Kashmir Files: राजस्थानमध्ये चित्रपट पाहण्यासाठी 144 कलम लागू

हायकोर्टाच्या या निर्णयामुळं पुढील तीन आठवड्यात नारायण राणे यांच्याकडे पुन्हा कोर्टात दाद मागण्याचा पर्याय खुला असेल. त्यामुळं नारायण राणेंच्या याचिकेवर हायकोर्टानं सुनावणी घेत पालिकेला सध्यातरी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले, यामुळं नारायण राणे यांना दिलासा मिळाला.

Web Title: Great Relief To Narayan Rane Mumbai High Court Says No Immediate Action On Bmc Notic

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top