The Kashmir Files: राजस्थानमध्ये चित्रपट पाहण्यासाठी 144 कलम लागू

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या (Vivek Agnihotry) चित्रपटानं आता देशभर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली (Bollywood News) आहे.
Vivek Agnihotry
Vivek Agnihotry esakal

The Kashmir Files: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या (Vivek Agnihotry) चित्रपटानं आता देशभर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली (Bollywood News) आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरुन वेगवेगळ्य़ा प्रकारे वादाला सुरुवात झाली आहे. देशातील काही राज्यांमध्ये या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री (Entertainment News) कऱण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र त्याला कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही. दुसरीकडे काही शहरांमधील थिएटरमध्ये प्रेक्षकांना द काश्मीर फाईल्सचा शो बळजबरीनं (Bachchan Pandey) पाहण्यास सांगितला जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा शो ज्या थिएटरमध्ये सुरु होता तिथे काश्मीर फाईल्स सुरु करण्याची मागणी काही व्यक्तींनी केली होती.

आता राजस्थानमधील एक घटना समोर आली आहे. राजस्थानातील एका जिल्ह्यामध्ये आज सकाळी सहा वाजल्यापासून 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी द काश्मीर फाईल्सचे स्क्रिनिंग सुरु असेल त्याठिकाणी हा नियम लागु होणार आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री संतापले आहे. त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोटा जिल्ह्यामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिलपर्यत 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या गोष्टीला आपला विरोध दर्शवला आहे.

यासंबंधी विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली असून त्यातून त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. त्यांनी याप्रकरणी माहिती आणि सुचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. अग्निहोत्री यांनी ट्विटवर लिहिलं आहे की, प्रिय अनुराग ठाकुर लोकशाही देशामध्ये न्यायाच्या आधिकारावर जो चित्रपट तयार केला आहे तो पाहण्यासाठी प्रेक्षक एकत्र येत आहेत. अशावेळी त्यांच्यासाठी वेगळी नियमावली तयार केली जात आहे. तर मग आपण आणखी काय न्यायाची अपेक्षा करायची? असा प्रश्न अग्निहोत्री यांनी ठाकुर यांना विचारला आहे.

Vivek Agnihotry
Viral Video : माजंरीला पाहण्यासाठी दोन पायांवर उभा राहिला कुत्रा

अग्निहोत्री यांनी ही पोस्ट मुख्यमंत्री गहलोत यांनाही टॅग केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, दहशवाद्यांच्या दहशतवादानं आपण घाबरून गेलो आहोत. याप्रसंगी अग्निहोत्रींनी प्रेक्षकांनाच आता न्याय कशाला म्हणायचं? आता तुमच्यासाठी न्याय करण्याची योग्य वेळ आहे. अशा प्रकारचं सुचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. याप्रकरणावर जिल्हाधिकारी यांचं म्हणणं आहे की, येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव यांचे आयोजन वेगवेगळ्या भागांमध्ये करण्यात आले आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचा धार्मिक संघर्ष होऊ नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टींबाबत काळजी घेण्यात आली आहे.

Vivek Agnihotry
Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com