मुंबईतील लोकवस्त्या होताहेत सुन्या सु्न्या! बेरोजगारीमुळे स्थलांतर वाढले

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 May 2020

कोरोनामुळे लॉकडाऊन आले आणि त्यामुळे अनेक स्थलांतरीतांनी मुंबई सोडण्याचे ठरवले. त्यामुळे मुंबईतील अनेकजण स्थलांतरीत परतू लागले आहेत. त्यामुळे अनेक वस्त्या ओस पडल्या आहेत.

मुंबई : जूहू कोळीवाडा वस्ती आता सुनीसुनी झाली आहे. अनेक स्थलांतरीत येथे रहात होते. ते परिसरातील बारमध्ये काम करीत होते, किंवा भेळपुरी विकत होते, मात्र आता त्यापैकी कोणीच येथे रहात नाही. या परिसरात काही आठवड्यांपर्यंत रिक्षा उभ्या रहात असत. त्याचे मालक रिक्षा घेऊन आपल्या गावाला परतले आहेत. 

मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

कोरोनामुळे लॉकडाऊन आले आणि त्यामुळे अनेक स्थलांतरीतांनी मुंबई सोडण्याचे ठरवले. त्यामुळे मुंबईतील अनेकजण स्थलांतरीत परतू लागले आहेत. त्यामुळे अनेक वस्त्या ओस पडल्या आहेत. एचबी गावडे मार्गावरील भय्यावाडीत साडेतीन हजार लोक रहात असत, पण आता हा काही महिन्यापूर्वी कमालीचा गजबजलेला परीसर कमालीचा शांत झाला आहे. 
लॉकडाऊन वाढत चालले होते, पैसे मिळत नव्हते, सरकारची मदत येत नव्हती. काही दिवसांपूर्वी आपण सन्मानाने जगत होतो. आता पोटासाठी हात पसरावे आहेत, हे त्यांना सहन झाले नाही. त्यातील अनेक जण रिक्षांनी गावाकडे निघाले. त्यातील पंधरा रिक्षा तर थेट मुंबईहून बिहारला निघाले आणि पाच दिवसात पोहोचलेही. 

महिन्याभरात पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना दोनदा पत्र, पत्रास कारण की...

स्थलांतरीतांनी श्रमिक स्पेशलने गावाला जाण्याचे ठरवले, पण गावाला जाणाऱ्यांची रांग संपत नव्हती. अखेर त्यांनी रिक्षांनी जाण्याचे ठरवले. प्रवासात काहीही खायला मिळाले नाही. आता गावाला पोहोचल्यावर विलगीकरण करण्यात आले आहे, पण त्यापूर्वीची अवस्था वाईट होती असेच ते सांगतात. 
लॉकडाऊन सुरु झाल्यावर आम्हाला दहा दिवसात खाणे मिळेल असे सांगितले जात होते. पण महापालिकेकडून काहीही मिळालेले नाही. काही स्वयंसेवी संस्थांनी मदत केली, पण ती पुरेशी नव्हती. आता ही अवस्था झाल्यामुळे ते परतण्यास तयार नाहीत. कुटुंबियांना खायला काय देणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bustling juhu slum is now a ghost colony in mumbai