esakal | ग्रीन कॉरिडॉर सुस्साट! 'या' ठिकाणाहून फक्त ८३ मिनिटांत हृदय पोहोचले
sakal

बोलून बातमी शोधा

Green Corridor

ग्रीन कॉरिडॉर सुस्साट! 'या' ठिकाणाहून फक्त ८३ मिनिटांत हृदय पोहोचले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मुंबई : पुण्यात (Pune) ब्रेन डेड म्हणून घोषित केलेला हृदय (Heart) पुण्यातून बेलापूरपर्यंत ग्रीन कॉरिडॉरने (Green Corridor) पोहोचवण्यात आला. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून (Jahangir Hospital) नवी मुंबईच्या बेलापूरमधील अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospital) येथे फक्त 83 मिनिटांत हे हृदय पोहोचवले गेले. सकाळी 8.30 वाजता पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून या हृदयाचा प्रवास सुरु झाला. सकाळी 10:03 मिनिटांनी हे हृदय पोहोचवले गेले. त्यानंतर इलेक्ट्रिकल काम करणाऱ्या रवी शर्मन अहिरवार (29) यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई (Navi Mumbai) येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. रवी यांना डायलेटेड कार्डीओमायोपॅथीचा त्रास होत होता ज्यामुळे ते हृदय निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. त्यांच्या या त्रासाचे निदान 2007 साली करण्यात आले. ( Green Corridor Reaches Belapur Apollo Hospital just Eighty three minutes from Pune-nss91 )

2019 मध्ये लक्षणे वाढली, अगदी काही पावले चालल्यावर देखील धाप लागणे, पायांवर सूज आणि फुफ्फुसे व पोटात द्रव जमा होणे असे त्रास वाढू लागले. त्यामुळे हृदयावरील उपचारांसाठी त्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळा रुग्णालयात भरती करावे लागत होते. फेब्रुवारी 2020 मध्ये क्लिनिकल नियमांना अनुसरून झेडटीसीसीकडे हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नावनोंदणी करण्यात आली. तब्बल वर्षभर ते प्रतीक्षायादीवर होते आणि त्या काळात त्यांचे हृदय फक्त 15% काम करू शकत होते. झेडटीसीसीमार्फत पुण्यामध्ये ब्रेन डेड महिला पात्र दाता उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णालयाने तयारी सुरू केली.

हेही वाचा: महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार, प्रसाद लाडांचा आरोप

आम्ही तातडीने याची माहिती रुग्णाला दिली आणि हृदय प्रत्यारोपणासाठी सर्व आवश्यक तयारी केली. सकाळी 8.30 वाजता पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून या हृदयाचा प्रवास सुरु झाला आणि ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने पुढच्या अवघ्या 83 मिनिटांत ते बेलापूरमधील अपोलो हॉस्पिटल्समध्ये पोहोचवण्यात आले. 1 तास 30 मिनिटांत या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर आता रुग्ण बरा आहे, शुद्धीवर आलेला आहे आणि आजूबाजूला काय बोलले जात आहे ते त्याला समजते आहे. आजवर अपोलो हॉस्पिटल्समध्ये 5 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. अशी माहिती या शस्त्रक्रियेचे प्रमुख डॉक्टर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील कन्सल्टन्ट, सीव्हीटीएस आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी डॉ. संजीव जाधव यांनी दिली.

-----

loading image