

Vehicle Green Tax
ESakal
राज्यातील वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढत्या वाहन वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्र विधानसभेने "महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६" ला एकमताने मंजुरी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या कायद्याचा उद्देश प्रदूषण नियंत्रण आणि हरित वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा आहे.