VIDEO : आरारा... वरातीतच नवऱ्याची फाटली पॅन्ट आणि...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मुंबई - लग्नाआधीची वरात म्हणजे वऱ्हाड्यांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण. अशा वरातींमध्ये होणारी भांडणं पण काही नवीन नाही. मात्र या वरातीत जरा वेगळाच प्रकार घडलाय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वरातीत सगळ्यांचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे नवरा. मात्र वरातीतच जर नारोबांची पॅन्ट फाटकी तर ? असाच काहीसा प्रकार या वरातीत घडलाय. वरातीदरम्यान हा नवरा सतत घोड्यावरून उतरचढ करत होता. मात्र घोड्यावर चढताना त्याची पॅन्ट फाटली आणि एका अतीउत्साही माणसाने त्याचा व्हिडिओ देखील ताटाकल शूट केला. हाच व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होतोय. 

मोठी बातमी - ते घेत होते तिरुपती बालाजीचं दर्शन आणि इथे घरातील बेडरूममध्ये...

नक्की कशी फाटली नवरोबाची पॅन्ट ? 

वरातीदरम्यान वऱ्हाड्यांसोबत नाचण्यासाठी नवरोबा सतत घोड्यावरून खाली-वर उतरचढ करत होता. असंच एकदा घोड्यावर चढत असताना या नवरदेवाची पॅन्ट फाटली. पॅन्ट फाटल्यामुळे नवरदेव वऱ्हाड्यांवर चांगलाच संतापला आणि ओरडून तो वऱ्हाड्यांना "माझी पँट फाटली आहे आणि मला दुसरी पॅन्ट आणून द्या" असं देखील म्हणाला. झाल्या प्रकारामुळे नवरदेव चांगलाच तापला होता. या वरातीमध्येच असलेल्या एकानं या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात शूट करून वायरल केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओवर मिम्स देखील बनायला सुरुवात झालीये.

आतापर्यंत सोशल मीडियावर या व्हिडीओला तब्ब्ल १६.२ मिलियन व्ह्यू मिळालेत म्हणजेच हा व्हिडीओ अनेकांनी पाहिलाय. ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. याआधीही वरातीमध्ये नवरदेवाची फजिती झाल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

मोठी बातमी - "हा तर मुंबईकरांना आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढण्याचा डाव..."

नवरदेव घोड्यावरून खाली पडल्याचा व्हिडिओ असो किंवा कधी नवरदेवानं वरातीमध्ये अमाप पैसे उधळल्याचा व्हिडिओ असो अशा व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असते.

grooms pant gets torn during his own wedding video viral on social media     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grooms pant gets torn during his own wedding video viral on social media