ते घेत होते तिरुपती बालाजीचं दर्शन आणि इथे घरातील बेडरूममध्ये...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मुंबई : घरून देवदर्शनाला गेल्यानंतर आपल्या मागे आपल्याच घरात काय घडेल काही सांगता येत नाही. कल्याणमधल्या तिसगाव इथे राहणाऱ्या एका कुटुंबासोबत असाच प्रकार घडलाय. हे कुटुंब तिरूपतीला देवदर्शनासाठी गेलं असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून लाखोंचे दागिने लंपास केले आहे.

मुंबई : घरून देवदर्शनाला गेल्यानंतर आपल्या मागे आपल्याच घरात काय घडेल काही सांगता येत नाही. कल्याणमधल्या तिसगाव इथे राहणाऱ्या एका कुटुंबासोबत असाच प्रकार घडलाय. हे कुटुंब तिरूपतीला देवदर्शनासाठी गेलं असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून लाखोंचे दागिने लंपास केले आहे.

सध्या कल्याण आणि तिसगाव या भागांमध्ये चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. चोर सतत काही घरांवर नजर ठेऊन असतात आणि त्या घरातील लोक बाहेर गेले की मग चोरी करतात. असा आरोप या भागात राहणाऱ्या नागरिकांकडून सतत केल्या जात आहेत. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणामुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. असाच एक भीषण प्रकार कल्याणमध्ये घडलाय. 

मोठी  बातमी - नको मोबाईल, नको कार्ड; आता फक्त चेहरा दाखवा आणि पेमेंट करा, कसं...

नक्की काय आहे प्रकार:

सुख शांती अपार्टमेंट तिसगाव कल्याण पूर्व इथे राहणारे नितीश सुरेश राय हे आपल्या कुटुंबासोबत घराला कुलूप लाऊन तिरूपतीला बालाजींच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घरावर चोरट्यांची आधीपासूनच नजर होती. १-२ दिवसांपासून नितीश यांच्या घरी कोणीच नाहीये हे बघून ठेवलं. नितीश राय यांच्या घराचं कुलूप तोडून चोरटे आतमध्ये शिरले आणि बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून सोन्याची अंगठी, चेन, ब्रेसलेट,  मंगळसूत्र अशा दागिन्यांची चोरी केली. यामध्ये राय यांच्याकडून तब्बल २ लाख ३१ हजार रुपयांची चोरी करण्यात आलीये.

मोठी  बातमी - नाराज ओवेसींनी वारिस पठाणांविरुद्ध उचललं मोठं पाऊल, म्हणालेत...

तिरूपतीवरुन परत आल्यानंतर नितीश राय यांच्या कुटुंबासमोर हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या संबंधी अधिक तपास करतायत. त्यामुळे सर्वात श्रीमंत देवाच्या दर्शनाला गेलेल्या राय कुटुंबाला मात्र परत आल्यानंतर नुकसान सहन करावं लागलं आहे.

while they were taking blessing from tirupati balaji there was theft in the house       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: while they were taking blessing from tirupati balaji there was theft in the house