GST Fraud: मुंबईतील 15 विमा कंपन्यांकडून 824 कोटींचा जीएसटी घोटाळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST fraud in Miraj; action against mobile seller

GST Fraud: मुंबईतील 15 विमा कंपन्यांकडून 824 कोटींचा जीएसटी घोटाळा!

मुंबई विभागातील १५ विमा कंपन्यांनी मिळून तब्बल ८२४ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयानं केलेल्या तपासात याचा पर्दाफाश झाला आहे. (GST Fraud of 824 crores from 15 insurance companies in Mumbai)

जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या माहितीनुसार, विमा कंपन्या, मार्केटिंग कंपन्या तसेच अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून ८२४ कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी चोरी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कंपन्यांनी वस्तू आणि सेवा न देताच इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC चा लाभ घेतल्याचा आरोप आहे. पण याप्रकरणाची अद्याप चौकशी सुरु आहे.

अनेक शहरांमध्ये छापेमारी

या जीएसटी घोटाळ्यात काही मार्केटिंग कंपन्यांचा हात असल्याचंही DGGIनं म्हटलं आहे. या कंपन्या याच कामात गुंतल्या होत्या. मुंबई झोनच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विविध शहरांमधील विमा कंपन्यांच्या परिसरात चौकशी मोहिम राबवली होती.

हेही वाचा: Bomb Hoax: विमानात प्रवाशांमध्ये भांडण; पसरली बॉम्बची अफवा!

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, चौकशी एजन्सीला याचाही खुलासा झाला आहे की, या मार्केटिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीनं आयटीसी मंजूर करण्यासाठी एक व्यवस्था उभारली. तसेच एकमेकांच्या सुविधेसाठी बनावट बिलं तयार केली.